लोकलचे दोन डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही

लोकलचे दोन डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही

ठाणे : रेल्वेसाठी रविवार बिघाड दिवस ठरला आहे. मध्यरात्रीनंतर पहाटे पावणे दोनला ठाणे स्थानकानजीक आर्मी विशेष मालगाडीचे दोन डबे घसरल्याची घटना ताजी असतानाच ठाणे-नवी मुंबई ट्रान्सहार्बर मार्गावरील पटनी परिसरात सायंकाळच्या सुमारास ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे रूळावरून घसरले. सुदैवाने या दोन्ही दुर्धटनेत कुणीही जखमी झाले नाही.

ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ठाण्याच्या दिशने येणाऱ्या आणि ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. रात्री उशीरापर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने नवी मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांना खासगी किंवा एनएमएमटीच्या बसगाड्यांचा आसरा घ्यावा लागला.

ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे- वाशी लोकलचे दोन डबे रविवारी सायंकाळी 6:55 च्या सुमारास अचानक रूळावरून घसरले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली. मात्र, यानंतर ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नवी मुंबईत अनेक नामांकित कंपन्या आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण, मुलुंड या भागातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल झाले.

ट्रान्सहार्बर मार्ग बंद झाल्याने ऐरोली, रबाळे, कोपरखैरने रेल्वे स्थानकात गर्दी उसळली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नवी मुंबईतून ठाण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसगाड्या किंवा खासगी वाहनांच्या मदतीने ठाणे गाठले. तर बेलापूर, खारघर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुर्ल्याहून प्रवास करत पुन्हा कल्याण किंवा ठाणे लोकलने माघारी परतावे लागले. रात्री उशीरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com