मुंबई पोलिस आयुक्त बदनामी प्रकरणी सायबर सेलकडून दोन गुन्हे दाखल

पूजा विचारे
Tuesday, 6 October 2020

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. मुंबई सायबर सेलनंही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. मुंबई सायबर सेलनंही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलिस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलिस दलाला बदनाम करण्यात आलं. याप्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

80 हजार फेक अकाऊंट्स

सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जवळपास तीन महिने झाले. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूवरुन सुरु असलेला वाद अद्याप संपलेला नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे सुरु करण्यात आला. मात्र मुंबई पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होऊ लागली. याच दरम्यान  मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी या कालावधीत सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली.

अधिक वाचाः  मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?
 

या ८० हजार फेक अकाऊंटसच्या माध्यमातून बदनामी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून मुंबई पोलिस योग्य पद्धतीने करत होते. मात्र काही जणांनी ठरवून मुंबई पोलिसांची या प्रकरणात बदनामी केली आणि  काहींनी तर ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या एम्सनं देखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले.  मात्र मुंबई पोलिसांविरोधात रचलेल्या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत.

हेही वाचाः  सिव्हिल इंजिनिअर मारहाण प्रकरण, आव्हाडांच्या तीन अंगरक्षक पोलिसांना अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात सुशांतची आत्महत्या आणि मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् केवळ भारतातीलच नाही आहे. तर  इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या अशा देशातूनही या पोस्ट करण्यात आल्यात. 

Two FIRs registered IT Act against defaming Mumbai Police Commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two FIRs registered IT Act against defaming Mumbai Police Commissioner