मन सुन्न करणारी घटना : रविवारची सुट्टी म्हणून दहा जण गेलेत फिरायला, घरी मात्र परतलेत केवळ आठच

सुमित बागुल
Monday, 14 September 2020

घटना कालची असून या घटनेनंतर परिसरात खळबळ मजलीये. अग्निशमन दलाच्या साहाय्याने दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत

विरार : आनंदाच्या भरात कधी काय होईल याचा काही नेम नाही. "जोश में होश खो बैठाना" म्हणजे काय याचा प्रत्यय तुम्हाच्या ही बातमी वाचून नक्की येईल. सदर घटना विरारमध्ये घडलीये. मुंबईतील जोगेश्वरीतून बाईक राईडसाठी आलेल्या दोघांचा विरारमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. दुर्दैवी बाब म्हणजे दोघांचा विरार पूर्व येथील भाटपाडा मधील तलावात बुडून हकनाक बाली गेलाय. 

ही घटना कालची असून या घटनेनंतर परिसरात खळबळ मजलीये. अग्निशमन दलाच्या साहाय्याने दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. पंचवीस वर्षीय मंगेश राणे आणि चौतीस वर्षीय सूर्यकांत सुवर्णा असं या दोघांचं नाव आहे. 

महत्त्वाची बातमी : सुशांत सिंह मृत्यूप्रकरणः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आलिशान कारमधून ड्रग्सची तस्करी

रविवार म्हणजेच सुटीचा दिवस असल्याने जोगेश्वरीतील हिंद कॉलनीमधून दहा जणांचा ग्रुप विरारला आलेला. यापैकी काही जण दोन बाईकवर तर बाकीचे मित्र कारमधून विरारला आलेले. या आधीही फोटो काढताना किंवा स्लेफी काढताना अनेकांचा मृत्यू झालाय. याचीच पुनरावृत्ती विरारमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय. मंगेश राणे आणि सूर्यकांत सुवर्णा हे तलावा किनारी उभे राहून फोटो काढत होते. यावेळी अचानक दोघांचा पाय घसरून तलावाच्या पाण्यात पडून बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. 

कोरोनाचा कहर अद्याप थांबलेला नाही. या काळात अजूनही पर्यटनावर बंदी आहे. मात्र बंदी असूनही काही हौशी मंडळी नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे फिरायला बाहेर पडतायत. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम दररोज तोडले जातायत. वसई विरारमध्येही जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन बंदी घोषित करण्यात आलेली आहे. मात्र तरीही याभागात मोठ्या प्रमाणात ठाणे, कल्याण, मुंबईतून पर्यटक येत असतात. दरम्यान मृत पावलेले तरुण हे महिंद्रा अँड महिंद्र आणि एजीसएस या कंपन्यांमध्ये काम करणारे होते अशी माहिती मिळतेय. 

two friends lost their lives while enjoying near lakeside at virar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two friends lost their lives while enjoying near lakeside at virar