गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - विशाखापट्टणम येथून चोरट्या मार्गाने मुंबईत गांजा घेऊन आलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने गजाआड केले. तौसिफ रफीक खान आणि परवीन कासमअली

मुंबई - विशाखापट्टणम येथून चोरट्या मार्गाने मुंबईत गांजा घेऊन आलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने गजाआड केले. तौसिफ रफीक खान आणि परवीन कासमअली
जाफरी अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून 167 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 33 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. दोघांनाही न्यायालयाने 22 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
परवीन ही महिला अंधेरीच्या साकीनाका, तर तौसिफ हा नालासोपाऱ्यात राहतो. ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. शहरात गांजाला मागणी असल्याने ते दोघेही काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणम येथे गेले होते. तेथून त्या दोघांनी 167 किलो गांजा तस्करीकरता मुंबईत आणला होता. खासगी वाहनात गांजा ठेऊन परवीन ही साकीनाका येथे जात होती.

याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली. पोलिस निरीक्षक शशांक शेळके यांच्या पथकाने बुधवारी (ता.16) जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडजवळ सापळा रचला. खासगी वाहनातून आलेल्या परवीन आणि तौसिफला पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्या दोघांकडून 37 किलो गांजा आढळला. वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन गोणीत मिळून 130 किलो गांजा सापडला. पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली. तो गांजा विशाखापट्टणम येथून आणल्याची त्यांनी कबुली दिली. मुंबईतल्या काही वितरकांच्या माध्यमातून गांजा विक्री करण्याचे त्या दोघांनी ठरवले होते. गांजाच्या विक्रीतून दोघांना जास्त कमिशन मिळणार होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी एक खासगी वाहन जप्त केले आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: two ganja smuggler arrested crime