कामशेतजवळ हायवेवर वेगवेगळ्या अपघातांत ४ ठार, २५ जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदा आणि पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता.२१) पहाटे बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार लोक ठार झाले आहेत. तर २५ जण जखमी झाले आहे.

- जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदा आणि पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता.२१) पहाटे बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार लोक ठार झाले आहेत. तर २५ जण जखमी झाले आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.  हायवेवरील उतार आणि वळणावर पहाटेच्या सुमारास चालकास डुलकी लागल्याने बसने उभ्या वाहनांना मागून ठोकरल्याने हे दोन्ही अपघात झाले असण्याची शक्यता वाहतुक पोलिसांनी व्यक्त केली.

अपघातग्रस्तांवर ओझरडे येथील ट्रामा सेंटर आणि सोमटने येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed and two injured in separate accidents on the highway near Kamshet