esakal | ...त्यांनी मुख्याध्यापिकेला चांगलाच धडा शिकवला; वाचून तुम्हांलाही धक्का बसेल!
sakal

बोलून बातमी शोधा

 ...त्याने मुख्याध्यापिकेला चांगलाच धडा शिकवला; वाचून तुम्हांलाही धक्काच बसेल!

क्रेडिट कार्डमधील व्यवहारांची मर्यादा वाढवण्याच्या नावाखाली भामट्यांनी दादर येथील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेची दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी त्यांच्या खात्यावरून एकाहून अधिक व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. 

...त्यांनी मुख्याध्यापिकेला चांगलाच धडा शिकवला; वाचून तुम्हांलाही धक्का बसेल!

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : क्रेडिट कार्डमधील व्यवहारांची मर्यादा वाढवण्याच्या नावाखाली भामट्यांनी दादर येथील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेची दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी त्यांच्या खात्यावरून एकाहून अधिक व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. 

ही बातमी वाचली का? एक चूक पडली सव्वा दोन लाखाला; अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगण्याची चुक अजिबात करू नका

तक्रारदार महिलेकेडे खासगी बॅंकेचे क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्ड विभागातून विधी वर्मा नावाने त्यांना एक दूरध्वनी आला होता. विश्‍वास संपादनासाठी वर्माने या महिलेच्या क्रेडिट कार्डचा 16 अंकी क्रमांक सांगितला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून आरोपी महिलेने त्यांच्याकडून सीव्हीव्ही क्रमांक व क्रेडिट कार्डची मुदत आदी माहिती मिळवली. त्यानंतर क्रेडिट कार्डवरील व्यवहारांची मर्यादा वाढवण्यासाठी एक ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. तो सांगितल्यास क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे वर्माने त्यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने संबंधित ओटीपी या महिलेला सांगितला. त्यानंतर कार्डवरून दोन लाख रुपयांचे व्यवहार झाले. त्याबाबत तक्रारदार महिलेने विचारले असता तो प्रक्रियेचा भाग असून, ती रक्कम कार्डमध्ये पुन्हा जमा होईल, असे वर्माने सांगितले.

ही बातमी वाचली का? तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले....


त्यानंतर जुलै महिन्यात तक्रारदार महिलेला त्यांच्या क्रेडीट कार्डची स्टेटमेंट मिळाली असता त्यांच्या क्रेडीट कार्डमधून दोन लाख रुपयांचे व्यवहार रद्द झाले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता ई वॉलेटमधून पाच व्यवहारांच्या सहाय्याने दोन लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. 

ही बातमी वाचली का? तीन हजार किलोमीटर अंतर कापून आलेल्या पक्षाचा राज्यात मृत्यू; बोरिवलीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

संशयितांचा शोध सुरू 
तक्रारदार मुख्याध्यापिकेने याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली असून, माहीम पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरध्वनी करणारा व्यक्ती हा पुरुष असून सॉफ्टवेअरच्या साह्याने महिलेच्या आवाजात बोलत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, मोबाईल क्रमांक व झालेल्या व्यवहारांच्या माध्यमातून संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image