तस्कराच्या कब्जातून दोन लाखाच्या मांडूळ सापाची सुटका

 Two lakhs of madla snake escape from the possession of smuggling
Two lakhs of madla snake escape from the possession of smuggling

उल्हासनगर : एका तस्कराच्या कब्जातून दोन लाख रुपये किंमत असलेल्या साडेतीन फुटाचा मांडूळ जातीच्या सापाची सुटका करण्यात हिललाईन पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली गेली असून दुसरा तस्कर फरार झाला आहे. काल सायंकाळी हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांच्या दालनात एक बातमीदार आला. त्याने सायंकाळी नेताजी चौक परिसरात मांडूळ जातीच्या सापाची विक्री तस्करा कडून केली जाणार असल्याची माहिती दिली. पलंगे यांनी त्याचक्षणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एन कौराती, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सुदीप भिंगारदिवे, गिरी, असवले, जावळे यांना बोलावले आणि सापळा रचून तस्करावर झडप घालण्याचे निर्देश दिले.

पोलिसांनी नेताजी परिसरात सापळा लावताना बातमीदारालाही सोबत घेतले. बराच वेळ निघून जात असताना सावज आले नाही. तेंव्हा तस्कराने ठिकाणाचा प्लॅन बदलला असून तो व्हीनस ते लालचक्की रोडवर व्यवहार करणार असल्याचे सांगताच पोलिसांनी त्यादिशेने मोर्चा वळवला. काही मिनिटांनी एक जण रिक्षातून उतरला. त्याच्या हातात गोणी होती. बातमीदाराने हाच तो असे लांबून दाखवताच साध्या गणवेशात असलेल्या पोलिसांनी सावजावर झडप घातली. गोणीची झाडाझडती घेतली असता, त्यात मातीत मांडूळ जातीचा साप मिळून आला.

आरोपीचे नाव रामचंद्र सेनानी असून त्याने हा साप अनिल लोचानी यांनी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सेनानी याला अटक केली असून लोचानी फरार झाला आहे. मांडूळ जातीच्या सापाची काळ्या जादू व्यतिरिक्त करणी, वशिकरण आदीसाठी वापर केला जातो. हा दुर्मिळ साप आहे. हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र नेताजी या हद्दी ऐवजी विठ्ठलवाडी ठाण्याच्या हद्दीत आरोपीला पकडण्यात आल्याने हा गुन्हा विठ्ठलवाडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सापाला बदलापूर क्षेत्राचे वनपाल नारायण माने यांच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती घनश्याम पलंगे, आर एन कौराती यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com