दिल्लीत ‘आप’ला राष्ट्रवादीचा दणका, केजरीवालांचे दोन आमदार फुटले..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मुंबई - सध्या संपूर्ण भारतात एकच चर्चा आहे ती म्हणजे राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्ण ताकद लाऊन भाजप आणि कॉंग्रेस विरोधात प्रचार करताना दिसतायत. तर दुसरीकडे भाजपही (AAP) आम आदमी पार्टीला कसं रोखता येईल याचाच विचार करते आहे. तिकडे कॉंग्रेससुद्धा निवडणुकांच्या तयारीत  मागे नाहीये. पण आता दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलाच धक्का बसला आहे. हा धक्का बसण्याच कारण  आहे महाराष्ट्रातील कणक्य म्हणून ओळख असलेले शरद पवार 

खतरनाक - #करोना व्हायरस : बचावासाठी मुंबईत या केल्या उपाययोजना

नेमकं घडलाय काय ? 

आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी आम आदमी पार्टीला रामराम ठोकत थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हे नेते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.  आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार फतेह सिंह आणि कमांडो सुरिंदर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे निरीक्षक के.के शर्मा आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याबाबत घोषणा केलीये. दोन्ही आमदारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

बापरे - आलियाच्या आईचं अफझल गुरूबद्दल वादग्रस्त वक्तव्य

का सोडला आम आदमी पक्ष? 

अरविंद केजरीवाल यांनी या विधानसभा निवडणुकांमध्ये या दोघांनाही  उमेदवारी नाकारली होती. त्यामुळेच फतेह सिंह आणि सुरिंदर सिंह नाराज होते. आम आदमी पक्षाने ७० उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र यात पक्षाने १५ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं होतं. फतेह सिंह यांच्या ऐवजी चौधरी सुरेंद्र कुमार यांना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज फतेह सिंह नाराज होते. म्हणूनच या दोन्ही आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती मिळतेय.

बापरे - 'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

जयंत पाटील यांनी केलं पक्षात स्वागत 

राष्ट्रवादी काँग्रेसनेही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांचेही पक्षात स्वागत केले आहे.   त्यांनी ‘दिल्ली अभी दूर नहीं’ अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे. फतेह सिंह यांनी गोकलपुर आणि  सुरिंदर सिंह यांनी दिल्ली- कँटॉन्मेंट येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

two leaders from aam aadmi party joined Nationalist congress party of sharad pawar 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two leaders from aam aadmi party joined Nationalist congress party of sharad pawar