मोठी बातमी - धारावीतील वाढतोय कोरोनाचा संसर्ग; आज आणखी दोघांना कोरोना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

काल धारावीत २ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज धारावीत आणखीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई  - महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग आता पाहायला मिळतोय. संपूर्ण मुंबई शहर कोरोना हॉटस्पॉट बनत चाललंय. याला कारण म्हणजे मुंबईत दिवसागणिक वाढत जाणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या. खबरदारीचे उपाय म्हणून मुंबईत महापालिकेने विविध स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये कोरोनाचा क्लस्टर स्प्रेड थांबवण्यासाठी मुंबईतील अनेक परिसर पूर्णतः सील करण्यात आले आहेत.

अशातच आता मुंबईतील सर्वात जास्त दाट लोकवस्ती असलेला परिसर कोरोना हॉटस्पॉट होऊ पाहतोय. हा परिसर आहे साडे आठ लाख लोकवस्तीचा मुंबईतील मोठा आणि गजबजलेला धारावी भाग. 

मोठी बातमी - विवीध ब्लड ग्रुप्स आणि कोणत्या ब्लड ग्रुपला आहे कोरोनाचा जास्त धोका, जाणून घ्या...

काल धारावीत २ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज धारावीत आणखीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता सात वरून नऊवर गेली आहे. PTI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.    

मोठी बातमी - रोहित पवार यांनी ट्विटरवरून सुनावलं, म्हणालेत "काम करताना किंचाळण्याची गरज नसते..."

मुंबई महानगर पालिकेकडून याआधीच धारावीतील काही भाग सील केलेला आहे. अशात धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा पाहता आता संपूर्ण धारावी सील करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.

धारावीत नागरिक अत्यंत दाटीवाटीने राहतात. एका लहानशा घरात ६ ते ८ नागरिक राहतात. सहा परिस्थितीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. धारावीत सर्वात पहिल्या रुग्णाच्या घरात ८ लोकं राहत असल्याची माहिती आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून दाटीवाटीने राहणाऱ्या इथल्या नागरिकांना काही मंगल कार्यालयं आणि काही शाळां किंवा त्यांच्या मैदानात हलवण्यात आल्याची माहिती आहे. 

two more people found covid19 people detected positive in dharavi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more people found covid19 people detected positive in dharavi