धारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

धारावीतील ८० वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्याच ४९ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झालीये. या आधीच रविवारी त्यांचीच ३० वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं.

मुंबई - साडे आठ लाख लोकसंख्या असलेल्या धारावीतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. मुंबईतील सर्वात जास्त दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत आता आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा झोपडपट्टीचा भाग असणाऱ्या धारावीमध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या सातवर गेली आहे.   

धारावीतील ८० वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्याच ४९ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झालीये. या आधीच रविवारी त्यांचीच ३० वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता महापालिकेकडून या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु आहे.  

मोठी बातमी - कोरोना टेस्टिंगसाठी 'फोन बूथ'; कोरोनाला लढा देण्यासाठी मुंबईत अनोखा प्रयोग

धारावीतील एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुंगांपैकी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे डॉक्टर बालिगा नगरमधील आहेत. यातील एकाच दुर्दैवी मृत्यू झालाय. याशिवाय धारावीत वैभव नगरमधील ३५ वर्षीय डॉक्टर, धारावीतील मुकुंद नगर भागात ४९ वर्षीय व्यक्ती आणि धारावीतील मदिना नगर एका २१ वर्षीय व्यक्तीला कोरोना झालाय.   

मोठी बातमी -  लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानात जातायत ? 'या' गोष्टींची पूर्ण काळजी घ्या...

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. काल म्हणजेच ६ एप्रिल रोजी एकाच दिवसात मुंबईत १२० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याचं पाहायला मिळालं. एका दिवसात मुंबईत वाढलेले हे सर्वाधीक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील वोकहार्ट आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने महापालिकेने हे दोन्ही हॉस्पिटल्स देखील सिल केलेत.

भारतात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत देखील वाढ होतेय. भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा साडेचार हजारांवर गेलाय.

two more positive cases found in mumbai Dharavi father and son tested positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more positive cases found in mumbai Dharavi father and son tested positive