मुंबई-गोवा महामार्गासाठी आणखी दोन वर्षे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सुरेश प्रभूंना पत्र

मुंबई-गोवा महामार्गासाठी आणखी दोन वर्षे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सुरेश प्रभूंना पत्र


मुंबई  ः मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. या मार्गाचे काम दहा टप्प्यांत सुरू असून, डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे उत्तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. या महामार्गाच्या कामासंदर्भात खासदार सुरेश प्रभू यांनी गडकरींना पत्र लिहिले होते. 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असल्याने वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे प्रवाशांची बरीच गैरसोय होते. चौपदरीकरणाच्या नावाखाली जागोजागी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुरेश प्रभू यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांना विचारणा केली होती. दरम्यान, गडकरी यांनी प्रभूंना पत्र पाठवून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती सांगितली. तळेगाव ते कळमाठ हा टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे, तर कळमाठ ते झाराप मार्गावरील टप्प्याचे चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाल्याची माहिती गडकरी यांनी पत्रात दिली आहे. 

टप्पेनिहाय कामाची सद्यस्थिती 
पनवेल ते इंदापूर डिसेंबर 2021 
इंदापूर ते वडपाले मार्च 2022 पर्यंत 
वीर ते भोगवन खुर्द डिसेंबर 2021 
भोगवन खुर्द ते कावठी मार्च 2022 
कशेडी ते परशुराम घाट जून 2021 
परशुराम घाट ते अरवली डिसेंबर 2021 
अरवली ते कांटे डिसेंबर 2022 
कांटे ते वाकड डिसेंबर 2022 
वाकड ते तळेगाव मार्च 2021 

Two more years for Mumbai-Goa highway; Union Minister Nitin Gadkari's letter to Suresh Prabhu

-------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com