घरावर दरड कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू; एक गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मुंबई ः कळवा (पूर्व) पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आतकोनेश्वर येथील एका घरावर सोमवारी (ता. 30) रात्री साडेबाराच्या सुमारास डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी आहे. 

मुंबई ः कळवा (पूर्व) पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आतकोनेश्वर येथील एका घरावर सोमवारी (ता. 30) रात्री साडेबाराच्या सुमारास डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी आहे. 

आतकोनेश्वर हा पारसिक डोंगराच्या पायथ्याशी वनविभागात वसलेला भाग आहे. सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास ज्ञानगंगा शाळेजवळील आदर्श चाळीतील डोंगराचा काही भाग एका घरावप कोसळला. त्यामुळे घराची भिंत कोसळल्याने झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील वीरेंद्र जयस्वाल(40), पत्नी नीलम(35) आणि मुलगा सनी (10) गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नीलम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनास्थळी तहसीलदार अधिक पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. 

...तर दुर्घटना टळली असती! 
हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. गेल्या काही वर्षांत अनेक भूमाफियांनी परिसरात अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. वाढत्या अतिक्रमणांकडे वनविभागांचे दुर्लक्ष होत असल्याने झोपड्यांची संख्या वाढतच आहे. वेळीच अतिक्रमण हटवले असते तर ही दुर्घटना टळली असती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two people died in landslide