दोन दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा सोमवारी (ता. 9) शिवडी येथे अपघाती मृत्यू झाला.

मोटरसायकल ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. सलमान अब्दुल जब्बा खान ऊर्फ बोबो (वय 22) व सलमान नफीस खान (24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते शिवडी क्रॉस रोड येथे राहत होते. या प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिस ठाण्यात ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोबोने 50 हजारांचे कर्ज घेऊन मोटरसायकल खरेदी केली होती. तो आणि त्याचा मित्र सलमान सोमवारी रात्री 11 च्या सुमारास फेरफटका मारण्यास झकेरिया बंदर रोडने दक्षिण मुंबईकडे निघाले होते. त्याच वेळी समोरून आलेल्या ट्रकने अचानक यू टर्न घेतला आणि बोबोची मोटरसायकल त्यावर आदळली. दोघांनीही हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला. ट्रकमालक अशफाक यांच्याशी संपर्क साधून पोलिसांनी ट्रकचालकाची माहिती मिळवली आहे. त्याचा शोध सुरू आहे.

बोबोचा लहान भाऊ झुबेरचाही सहा महिन्यांपूर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.

Web Title: two person death in accident