पालिका खरेदी करणार दोन बचाव वाहने 

पालिका खरेदी करणार दोन बचाव वाहने 

नवी मुंबई - शीव-पनवेल महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय ठरला आहे. नवी मुंबई पालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार करून अपघातग्रस्तांचा बचाव करणे, त्यांना वाहनांतून बाहेर काढणे आदी तातडीची कामे करण्यासाठी अग्निशम विभागाच्या ताफ्यात दोन बचाव वाहनांचा (रेस्क्‍यु टेंडर) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही वाहने बेलापूर आणि नेरूळ येथील अग्निशमन केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. विदेशी बनावटीच्या या वाहनांमुळे अपघातासह आपत्कालीन स्थितीतही मोठा उपयोग होणार आहे. 

महापालिकेच्या वाशी, ऐरोली आणि कोपरखैरणे अग्निशमन केंद्रात प्रत्येकी एक बचाव वाहन आहे. वाशीत 2015 मध्ये, तर ऐरोलीत 2016 मध्ये ही वाहने खरेदी केली आहेत. कोपरखैरण्यातील केंद्रासाठी नुकतेच हे बचाव वाहन खरेदी केले आहे. उर्वरित बेलापूर आणि नेरूळ अशा दोन अग्निशमन केंद्रांवर बचाव वाहन नसल्यामुळे या दोन्ही अग्निशमन केंद्रांच्या हद्दीत येत असलेल्या शीव-पनवेल महामार्ग आणि पामबीच-जेएनपीटी मार्गावरील अपघाग्रस्त वाहनांना तत्काळ सुविधा देता येत नाही. या दोन्ही मार्गांवर अवजड वाहनांची ये-जा दिवसभर सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे आगविषयी सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार अग्निशमन केंद्रानिहाय एक बचाव वाहन खरेदी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही अग्निशमन केंद्रांकरिता विदेशी बनावटीची दोन बचाव वाहने खरेदी करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्याकरिता अंदाजे सुमारे चार कोटी 82 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

वाहन एक, उपयोग अनेक 
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वाचवण्यासाठी विदेशी बनावटीची उपकरणे सुसज्ज ठेवण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न आहे. रस्ते अपघातात वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव वाहनांचा उपयोग होतो. दुर्घटनांच्या वेळी इमारतींमध्ये अडकलेल्या व्यक्ती, पडलेली झाडे बाजूला करणे, इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे आदी आपत्कालीन परिस्थितींमध्ये त्यांचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे करता येतो. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com