दुचाकी चोरणारे बंटी-बबली अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - देवनार परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या बंटी आणि बबली जोडीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. रफीक शेख (वय 27) आणि झरीन शेख (वय 29) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ ऍक्‍टिव्हा स्कूटर जप्त केल्या. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील देवनार, मानखुर्द परिसरातून अनेक दिवसांपासून फक्त ऍक्‍टिव्हा स्कूटर चोरीला जात असल्याच्या तक्रारीत आल्या होत्या. गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी होत होते. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणात चोरट्यांचा मागमूस लागत नव्हता. अखेर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात एक महिला दुचाकी ढकलून नेत असल्याचे दिसले. काही अंतर गेल्यावर एका पुरुषाने ती दुचाकी सुरू केल्याचे आणि दोघांनी पळ काढल्याचे या चित्रणातून स्पष्ट झाले. त्या चित्रणाच्या आधारे पोलिसांनी या बंटी-बबलीचा शोध सुरू केला.
अखेर देवनार येथे दुचाकी चोरताना या दोघांना पोलिसांनी पकडले.

Web Title: Two Wheeler Theft Bunty Babli Arrested Crime