
Mumbai News : धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांचा पुन्हा राडा; दोन महिला गटात तुफान हाणामारी!
मुंबई : पुन्हा एकदा धावत्या लोकलमधील महिला डब्यात दोन महिलांच्या हाणामारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु, ही घटना कोणत्या लोकलमधील आहे या संदर्भात माहीत समोर आलेली नाही.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना शिविगाळ करत असल्याचे दिसत आहे. त्यातच एका महिलेने अचनाक समोरील महिलेच्या कनशीलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या सदर महिलेने हल्ला करणार्या महिलेच्या केस ओढत खाली वाकवून मारहाण केली.
त्यामुळे महिला विव्हळू लगल्याने बाजूलाच उभा असलेल्या सह प्रवासी महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानात दिसून येत आहे. सदरच भांडणाचा व्हिडिओ सह प्रवाशांनी तयार करत सोशल मिडियावर शेअर केली असून त्याला पाच हजारहून अनेक युझर्रसनी लाईक केले आहे. मात्र ही घटना कोणत्या लोकलमध्ये घडलेली आहे. या संदर्भात अद्यापही माहिती समोर आलेली नाही.