माळशेज घाटात दरड कोसळून दोन महिला जखमी

मुरलीधर दळवी
शनिवार, 14 जुलै 2018

मुरबाड (ठाणे) : माळशेज घाटात शनिवारी ता 14 दुपारी छत्री पॉईंट जवळ दरड कोसळल्याने दोन महिला जखमी झाल्या. रस्त्यावर दरड कोसळल्याने माळशेज घटमार्गे जाणारी वाहतूक बंद झाली होती. राष्टीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दगड मातीचा ढिगारा हलवून दोन तासात वाहतूक सुरु केली संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.

जखमी झालेल्या महिलांची नावे श्रद्धा पाटील व सुजाता पाटील अशी आहेत. त्यांना औषध उपचारासाठी आळेफाटा येथे नेण्यात आल्याचे टोकावडे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्या माळशेज घाटात वर्षा सहलीसाठी आल्या होत्या. घटनेची माहीती मिळताच तहसिलदार सचिन चौधर व नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये 31 जुलैपर्यंत माळशेज घाटातील धबधब्यांजवळील एक किलोमीटर परिसरात पर्यटकांना प्रतिबंध केला आहे.

Web Title: Two women injured in road accident in Malsege Ghat