शरद पवारांच्या उपस्थितीसाठी दोन वर्षे उशिरा लग्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

शहापुरात आमदार बरोरा यांच्या मुलाचा आज विवाह 

शहापुरात आमदार बरोरा यांच्या मुलाचा आज विवाह 

शहापूर - विवाह सोहळ्यास आपले पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहावेत म्हणून आपल्या मुलाचे लग्न दोन वर्षे उशिरा करण्याचा निर्णय शहापुरातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीची वेळ निश्‍चित झाल्यानंतरच त्यांनी आपल्या मुलाच्या विवाहाची तारीख ठरवली असून, उद्या (ता. 22) बरोरा यांचे चिरंजीव आणि ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती निखिल बरोरा यांचे लग्न पार पडणार आहे. शरद पवार यांना विचारूनच ही वेळ ठरविण्यात आली असून, यामुळे हा विवाह दोन वर्ष उशिरा पार पडत असल्याची माहिती आहे. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री सुनील तटकरे, चित्रा वाघ, माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार किसन कथोरे, कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे, बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर, तसेच खासदार कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार दत्ता भरणे, कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, तसेच सर्व पक्षांचे जिल्हाप्रमुख, आमदार, माजी आमदार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पांडुरंग बरोरा यांनी दिली.

Web Title: Two years late marriage for Sharad Pawar's presence