खोपोलीत एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

खोपोली : खोपोलीत एकाच दिवसात दोन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एकाच्या आत्महत्येमागील कारण समोर आले असून, दुसऱ्या घटनेतील आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक

खोपोली शहरात लौजी-चिंचवली परिसरात पिसाळ कुटुंब वास्तव्यास असून, या कुटुंबात अमर भगवान पिसाळ (31) या तरुणाचा मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात विवाह झाला होता. मात्र तीनच महिन्यांत काही कारणास्तव नवरा-बायकोत न पटल्याने त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अमर पिसाळ हा मानसिक दडपणाखाली वावरत होता. गुरुवारी रात्री तो त्याच्या खोलीत झोपला होता. सकाळी बराच वेळ झाला तरी अमर बेडरूममधून बाहेर न आल्याने त्याचे कुटुंबीय त्याला उठविण्यासाठी गेले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दुसरी घटना खोपोली भानवाज परिसरात मुकुंद नगर येथे घडली.

नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप असं करतंय प्लॅनिंग

भाड्याच्या रूममध्ये वास्तव्य करणाऱ्या अमर वसंत ढेरे (25, मूळ रा. राधानगरी, कोल्हापूर) या तरुणाने घरात दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. या दोन्हीही घटनांची नोंद खोपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार श्रीरंग किसवे तपास करीत आहे. 

Two young men commit suicide in Khopoli

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two young men commit suicide in Khopoli