उबरची समुद्रात ‘टॅक्‍सी’

Uber-Taxi
Uber-Taxi

मुंबई - उबर आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून समुद्रात बोट सेवा सुरू करणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी आणि मांडवा अशा मार्गांवर उबर बोट चालवण्यात येईल. शुक्रवारपासून (ता. १) सेवा सुरू होणार असून, प्रवासाच्या किमान १५ मिनिटे आधी बोटीचे तिकीट आरक्षित करता येईल. 

मुंबई व उपनगरांत रेल्वे, बस, टॅक्‍सी आणि रिक्षावर अवलंबून असलेल्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत उबरतर्फे समुद्रमार्गे ‘टॅक्‍सी’ सेवा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना स्पीड बोटीतून काही मिनिटांतच मांडवा, अलिबाग आणि घारापुरीला जाणे यामुळे सहज शक्‍य होणार आहे. मुंबईकरांना मोबाईलवरून एका क्‍लिकवर बोट प्रवासाचे तिकीटही यामुळे मिळू शकणार आहे.गेटवे ऑफ इंडियावरून १ फेब्रुवारीला उबर बोट सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा एक नवा पर्याय मिळेल. त्यानंतर अलिबाग आणि नवी मुंबईपर्यंत स्पीड बोट सुरू केली जाईल, असे उबरतर्फे सांगण्यात आले.

समुद्री टॅक्‍सी
उबरच्या समुद्री टॅक्‍सी सेवेत १० आसनी आणि सहा ते आठ आसनी अशा दोन प्रकारच्या स्पीड बोटी असतील. सुरुवातीला गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा बोट सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले.

उबरने समुद्र मार्गाने सेवा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाहतुकीसाठी नवा पर्याय मिळणार आहे. उबरची बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. त्यानंतर अन्य ठिकाणी अशी सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com