... तर माघार घेईन - उदयनराजे

Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale

मुंबई  - मी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असून माझे लीड तोडणारा कोणी असेल तर माझी माघार असेल, असे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आगामी निवडणुकांसाठी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात आढावा बैठक सुरू आहे. पक्षाच्या नवीन कार्यालयाचा पत्ता माहीत नसल्याने उयनराजे भोसले या बैठकीला उशिरा पोचले. त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, "शरद पवार यांचे मी आशीर्वाद घेतले असून, सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे.

शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल. मात्र बैठकीमध्ये मला विरोध करणाऱ्यांची ताकद किती हे पक्षाने पाहिले पाहिजे. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्‍य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड कोण तोडणारा असेल तर माझी माघार असेल.' सर्व पक्षाचे आमदार व खासदार माझे मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मला विरोध नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com