उदयनराजे यांच्याकडूनही धमकी - गुणरत्न सदावर्ते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यात समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यात समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

धमक्‍यांबाबत पोलिसांत तक्रार (एनसी) दाखल केली असून, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दूरध्वनीवरून मिळालेल्या धमक्‍यांचे ध्वनिमुद्रण आपल्याकडे आहे, अशी माहिती सदावर्ते यांनी ‘सकाळ’ला दिली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. हा हल्ला आपल्यावरील नसून, न्याय्य व्यवस्थेवरील आहे. न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्‍वास आहे. यापुढेही न घाबरता कायदेशीर लढाई सुरूच ठेवू, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी केवळ ‘एनसी’ नोंदवून ठेवू नये; प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) नोंदवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

कोण आहेत सदावर्ते?
नांदेडचे रहिवासी असलेले गुणरत्न सदावर्ते यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. मुंबईत वकिली सुरू केल्यानंतर त्यांनी अंगणवाड्यांचे प्रश्‍न, मराठा आरक्षण आदी विविध विषयांवर जनहित याचिका दाखल केल्या आहेत. सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारे वैजनाथ पाटील हे जालना जिल्ह्यातील मुरमा येथील रहिवासी आहेत. ते चार महिन्यांपासून पुण्यात नोकरी शोधत होते. पदवीधर असलेले पाटील यांचे आई-वडील शेतकरी आहेत.

Web Title: Udayanraje Bhosale Warning to Gunratna Sadawarte