'खेकड्या'वरून उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंत यांना झापले

'खेकड्या'वरून उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंत यांना झापले

मुबई : शिवसेनेचे नवनिर्वाचित जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधानांमुळे शिवसेनेची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांमुळे फुटले, असे अजब विधान केल्याने विरोधकांनी सावंत यांच्यासह शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. तानाजी सावंत यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरे ही चांगलेच संतावले असून, त्यांनी सावंत यांची फोनवरून खरडपट्टी काढत तोंडावर ताबा ठेवण्यास सांगितले असल्याचे समजते आहे.

तानाजी सावंत यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.मंत्री होण्याच्या आधी सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचारादरम्यान 'मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी होणार नाही, इतका पैसा माझ्याकडे आहे, असे वक्तव्य केलं होतं.

नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्या वादग्रस्त विधानाने चक्क सरकारलाच अडचणीत आणलं होतं. जलयुक्त शिवार योजनेतील कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करताच सावंत यांनी हा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच दिली होती. इतकेच नाही तर जलसंधारण खात्यातर्फे जलयुक्त शिवार योजनेमधील १३०० कामांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले होते.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू आहेत. यासाठी शिवसेना भाजपकडून अधिकच्या जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करत आहे. अशातच अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन होत असल्याने उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला अडचणीत आणतील अशी वादग्रस्त विधानं कुणीही करू नयेत अशी सक्त ताकीद दिली आहे.

कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो. चिपळूणमधील तिवरे धरण फुटून 20 नागरिकांचा मृत्यू झाला असला तरी उद्धव ठाकरे या ठिकाणी लोकांची विचारपूस करण्यासाठी फिरकलेले नाहीत. यासाठी देखील तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्यच कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com