आम्ही दिलेल्या घोषणा खऱ्या करून दाखवतो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - आम्ही फक्त घोषणा देत नाही तर त्या खऱ्या करून दाखवतो. भंपकपणाविरोधातील लढाई सुरू राहणार असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सर्वच मुद्दे यापुढेही राहतील, अशा शब्दांत शिवसेना-भाजपमधील संघर्ष संपला नसल्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. 

मुंबईत शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर निवडून आल्यानंतर महापालिका मुख्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या मंचावरून उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या विजयाबद्दल मुंबईतील मतदारांचे आभार मानून ते म्हणाले की, "मराठी माणसाच्या मनगटात किती ताकद असते हे आम्ही दाखवून दिले.' त्यांच्या भाषणाच्या वेळी जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. "आम्ही फक्त घोषणा देणारे नाही, तर दिलेल्या घोषणा खऱ्या करण्यात धन्यता मानतो,' असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

ठाकरे कुटुंबाने नगरसेवकांसह हुतात्मा चौकात अभिवादन केले. सर्व जण मुख्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत चालत गेले. 

स्मारकासाठी हात पसरणार नाही 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीचे सुधारित विधेयक विधिमंडळात मंजूर झाले, त्या वेळी शिवसेनेचे सदस्य उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणे कार्यवाही झाली. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो; मात्र स्मारकासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही. 

Web Title: Uddhav Thackeray to bjp