ई-मेलवरून शिवसेनेच्या 'करून दाखवले'ची खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईच्या बकाल अवस्थेकडे बोट दाखवत पाच वर्षांत आम्ही हे करून दाखवले, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यंग्यचित्र मुंबईकरांच्या मेलबॉक्‍समध्ये पडत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या या "ई प्रचारा'त सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. "टॅक्‍सपेयर मुंबईकर' या ई-मेल पत्त्यावरून असे मेल दररोज पडत आहेत. या प्रचाराचा सूत्रधार पडद्याआड असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई पालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेने "करून दाखवले' या घोषवाक्‍याने प्रचार केला. आता त्याचाच वापर शिवसेनेच्या विरोधात केला जात आहे. बेकायदा झोपड्या, तुंबलेली मुंबई दाखवून आम्ही हे करून दाखवले, असा उपरोध आणि उपहास करणारी ही व्यंग्यचित्रे चर्चेचा विषय ठरू लागली आहेत.

यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्‍त्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'शिवसेनेच्या विरोधात सुरू असलेल्या छुप्या प्रचाराला आम्ही महत्त्व देत नाही. बुरखा घालून बाण मारणारे स्वत:च लोकांची फसवणूक करत आहेत. मतदार अशा प्रचाराला भुलणार नाहीत. टीका करायचीच असेल, तर जाहीरपणे करा. मैदानात येऊन लढा.''

Web Title: uddhav thackeray cartoon in mumbai mailbox