राज्यात संचारबंदी? महाविकास आघाडीतील मोठ्या मंत्र्याचे संकेत

Lockdown
LockdownCanva

राज्यातील कोरोना परस्थिती पुन्हा ढसळण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावर बोलताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिलीय. (Night Curfew in Maharashtra)

राज्यात कोरोना रुग्णांची दररोज १८ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याचा धोका वाढलाय. यामुळे गरज भासल्यास लवकरच निर्बंध कडक करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलंय. सध्या राज्यातील झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता यावर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात, असंही ते म्हणाले. (Maharashtra Night Curfew)

ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.

राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

दिल्लीत पंतप्रधान मोदींचीही बैठक

देशातील वाढणाऱ्या ओमिक्रॉन रुग्णांवर नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी नीती आयोग, आरोग्य मंत्रालय आणि अन्य टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. राज्यांना नाईट कर्फ्यू साठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, राज्यातील ऑक्सिजनसाठा, बेडची व्यवस्था आणि एक महिन्याचा अतिरिक्त औषधसाठ्याचे नियोजन कऱण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com