उद्धव ठाकरेंनी प्रति'मातोश्री' तयार केली, त्यामुळं...; भरत गोगावले स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
Shiv Sena chief whip Bharat Gogawale send disqualify notices to 14 mla excluding Aaditya Thackeray
Shiv Sena chief whip Bharat Gogawale send disqualify notices to 14 mla excluding Aaditya Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरेंनी प्रतिमातोश्री तयार केली आहे त्यामुळं त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केलं. (Uddhav Thackeray made a copy of Matoshri says Bharat Gogavale)

Shiv Sena chief whip Bharat Gogawale send disqualify notices to 14 mla excluding Aaditya Thackeray
राज ठाकरेंच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले...

गोगावले म्हणाले, मातोश्री हे ठिकाण बाळासाहेब ठाकरेंचं आहे. मातोश्री उभी कोणी केली तर त्यांनीच. उद्धव ठाकेरंनी त्याच्यासमोर आता नवी मातोश्री तयार केली आहे. त्यामुळं त्यांच्या मातोश्रीवर जायचं की नाही हे आमच्या नेत्यांशी चर्चा करुन आम्हाला ठरवावं लागेल. बाळासाहेबांची मातोश्री तीन मजल्यांची आहे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री आठ मजल्यांची आहे. त्यामुळं आम्हाला आठ मजले चढता येणार नाहीत केवळ तीन मजले आम्ही चढून जाऊ शकतो.

खासदार आणि नगरसेवक संपर्कात आहेत का?

शिवसेनेचे खासदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर बोलताना भरत गोगावले म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच ब्रीद वाक्य घेऊन पुढे चाललेलो आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. स्वतः मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी हे सभागृहात सांगितलं आहे. पण शिवसेनेचे खासदार आणि छोटे पदाधिकारी शिंदे यांच्या संपर्कात आहेत की नाही हे आम्हाला माहिती नाही, हे शिंदेंनाच माहिती आहे. परंतू खासदार राहुल शेवाळे यांनी काल जे सांगितलं त्यावरुन तुम्हाला कल्पना यायला पाहिजे.

अपात्र आमदारांच्या १४ जणांच्या यादीतून आदित्य टाकरेंना का वगळलं?

शिंदे गटाकडून व्हिप न पाळल्याप्रकरणी १४ जणांच्या यादीतून आदित्य ठाकरे यांना का वगळण्यात आल्याबद्दल भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार १४ जणांच्या अपात्रतेच्या यादीतून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. आम्ही अजून सगळं काही विसरलेलो नाही.

संजय राऊतांमुळं बंडखोरीची वेळ

संजय राऊत काय बोलत आहेत याचे परिणाम काय होत होते हे माध्यमांना चांगलं माहिती आहे. संजय राठोड जे म्हटलेत त्यात चुकीचं काही नाही. आमचे ४० जण आणि १० अपक्ष अशा ५० जणांनी देखील हेच सांगितलं आहे की, संजय राऊत यांनी काय केलंय. संजय राऊतांमुळंच आमच्यावर बंडखोरीची वेळ आली, असा गंभीर आरोपही यावेळी गोगावले यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com