"भाजपची प्रत्येक अडचण समजून घेणार नाही"- उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राने दिलेल्या जनादेशाचा मान ठेवत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या निकालबाबत आभार मानलेत. आता यापुढे कोणी EVM वर प्रश्न उठवणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणलेत.  

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा एक वेगळाच अंदाज आज पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. लोकसभेनंतर 50-50 चं सूत्र ठरलं होतं. आता त्या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत बैठक घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय.

 

मुख्यमंत्री कुणाचा ? 

लोकसभेनंतर भाजप आणि शिवसेनेचं 50-50 चं सूत्र ठरलंय. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही भाजपची अडचण समजून घेतली. मात्र, भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचे डोळे उघडलेत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर येऊ. सत्तास्थापनेसाठी वेडेवाकडे निर्णय घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

निवडणुकीत हार जीत होत असते. महाराष्ट्राने महायुतीला सत्तास्थापन करण्याएव्हढ्या जागा दिल्यात. ज्या चुका झाल्यात, त्या चुका परत होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या पाच वर्षात अत्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हंटले. 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचं अभिनंदन केलंय. विरोधकांनी गेली पाच वर्ष झोपेत घालवली. आता झोपू नका, म्हणजे आमच्यावरचा ताण कमी होईल असंही उद्धव ठाकरे म्हणलेत. 

WebTitle - uddhav thackeray press conference after Vidhansabha election results

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray press conference after election results