भेसळीच्या रक्ताने आव्हान देऊ नये - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पालघर - नरेंद्र मोदी यांचा सध्याचा पक्ष हा कॉंग्रेसयुक्त भाजप असून, या भेसळीच्या रक्ताने भगव्याला आव्हान देऊ नये, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. भाजपच्या नीतीला जशास तसे उत्तर देऊ, असे सांगून त्यांनी एक व्यासपीठावर येऊन सवाल-जवाब करण्यासही ललकारले.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची पालघर येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अनेक आरोपांचा समाचार घेतला.
बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना नाही, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. 'भाजपच्या पापांचा पाढा वाचायला संपूर्ण रात्र कमी पडेल,'' असे सांगत हा काय वाजपेयी यांचा भाजप आहे का, असा प्रतिप्रश्‍न केला.

वनगा यांच्याप्रती निष्ठवंतांनी वणवा पेटवला असून, भाजपचा हम करे सो कायदा मोडीत काढायला आपला पक्ष सक्षम असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: uddhav thackeray talking BJP politics