शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं 'हे' ठरलं..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं कशी आणि आणि कधी सुटतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  महाराष्ट्रातील वाढीव पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणलेत. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. अशात महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी उशीर होतोय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सातारा आणि सांगलीच्या ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत.  याआधी देखील उद्धव ठाकरे ठाकरे नाशिक आणि मराठवाड्यात ओला दुष्काळ दौऱ्यावर गेले होते.  

Image may contain: text

उद्धव ठाकरे कराडमधून आपल्या पाहणी दौऱ्याची सुरवात करतील. सर्वात आधी कडेगाव पलूसमध्ये आलं पिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नेवरीमध्ये सोयाबीन आणि मुगाच्या पिकाची पाहणी करतील. सांगलीतील विटा आणि साताऱ्यातील मायणीमध्ये द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. पुढे पुसेगावमध्येआलं शेतीची पाहणी, फलटणमध्ये डाळिंब आणि ज्वारी शेतीची पाहणी आणि लोणंदमध्ये बाजरी पिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.  

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याआधी मराठवाड्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केलाय. पाहणी दौरा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून मला शेतीतलं काही कळंत नाही, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत आहेत, हेकेखोरांना सेना सरळ करेल; विमा कंपन्यांनी माणुसकीनं वागावे. बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवणे ताबडतोब थांबवावे. आणि पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नसतो; परिस्थितीवर मात करणं गरजेचं असल्याचे म्हटलं होतं. 

Web Title : uddhav thackeray to visit satara and sangali farmers suffered from returning rain

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray to visit satara and sangali farmers suffered from returning rain