मोदींच्या बैठकीला उद्धव ठाकरे राहणार गैरहजर

मिलिंद तांबे 
बुधवार, 19 जून 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' विषयावर आज संसदेत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' विषयावर आज संसदेत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मात्र शिवसेनेचा आज वर्धापनदिन असल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत होणाऱ्या पक्ष सोहळ्यात उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे मोदींनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेना गैरहजर रहाणार आहे. तसेच  'वन नेशन वन इलेक्शन' विषयावर शिवसेनेची अधिकृत भूमिका पत्राद्वारे पंतप्रधानांना कळवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray will not able to attend PM Modi s meeting