महाविकास आघाडीला संबोधित करतानाचं उद्धव ठाकरे याचं संपूर्ण भाषण

महाविकास आघाडीला संबोधित करतानाचं उद्धव ठाकरे याचं संपूर्ण भाषण

माननीय पवार साहेब, खर्गेजी किती जणांची नाव घ्यायची, सर्वच पक्षाचे सन्माननीय नेते, सन्माननीय आमदार खासदार आणि बांधवानो. मी इथे बसल्या बसल्या सर्वप्रथम एक फोटोग्राफार म्हणून समोरच्या फोटोग्राफारला विचारलं  सगळा फोटो येतोय का ? तर तो बोलतो लेन्स नाहीये. वाइड एन्गल लेन्स पाहिजे. आता तिन्ही पक्षांचा पाया विस्तारत चालला आहे आणि हे दृश्य मुद्दामून केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशामध्ये नव्हे तर जगासमोर आपल्याला दाखवायचं होतं. कारण आपली जी लढाई आहे ती केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी 'सत्ता लोलूक' माणसं आपण नाही आहोत. आपलं जे एक वाक्य आहे, सत्यमेव जयते, ते सत्यमेव जयतेच असलं पाहिजे. 'सत्तामेव जयते' आपण होऊ देऊ शकत नाही, होऊ देणार नाही. हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत.

हे बघून सुद्धा ज्यांच्या डोळ्यामध्ये किंवा डोक्यात प्रकाश पडत नसेल, तर मला असं वाटतं की आपण तीनही पक्ष किंवा सोबतचे आलेले मित्रपक्ष  इतके मजबूत आहोत की डोक्यात जर काही काळोख असेल तर त्यात प्रकाश  आणि हिम्मत टाकण्या इतकी हिम्मत आपल्यात आहे. मी तर हे विधानसभेचं दृश्य पाहतोय. आपण सगळे जण, मी असं नाही म्हणत मी पुन्हा येईन.. आम्ही आलेलो आहोत.. आम्ही आलेलो आहोत.

आमचा रस्ता मोकळा करा  आणि मध्ये जरका अडसर म्हणून आलात तर ओलांडून नाहीतर काय करायचं ते करायला आम्ही समर्थ आहोत.  ते करण्याची ताकद आणि हिम्मत आमच्यामध्ये आहे जर आडवा यायचा प्रयत्न करत असाल तर मी तर म्हणतो करूनच बघा.. कारण शिवसेना काय चीज आहे हे पंचवीस तीस वर्ष तुमच्या सोबत असताना तुम्हाला जर कळलं नसेल तर शिवसेना समोर आल्यानंतर काय होतं याचा अनुभव घायचा असेल  तर त्याची सुद्धा आमची तयारी आहे. आणि आता सोबत आम्ही आलेलो आहोत.

एक गोष्ट बरी झाली, की जो काय केविलवाणा प्रयत्न झाला, हात पाय मारायचा, मी तर म्हणतो अजून करा.. कारण जेव्हढे तुम्ही प्रयत्न कराल आम्हाला अडवण्यासाठी.  तेव्हडे आम्ही अधिक घट्ट पणाने एकत्र येऊ. आणि मला खात्री आहे हे एकत्र आलेले तीन पक्ष नव्हे आपल्या सोबतचे आणखीन पक्ष केवळ पाच वर्षांसाठी किंवा खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेलो नाही तर पाचाचा पाढा आम्ही मोजू.. पाच एके पाच दुणे दहा.. त्याच्यानंतर  पंधरा वीस पंचवीस तीस वर्ष. आणि आम्ही या राज्यातून सुरु करतोय, शिवरायांच्या महाराष्ट्रामधून सुरु करतोय की सत्तेसाठी वाट्टेल ते करणारी शक्ती आम्ही पहिल्यांदा आमच्या या मातीमध्ये गाडून टाकू. आमच्या शिवरायांचा भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. ही ताकद , ही शक्ती आपण अशीच जपुयात. 

जय हिंद, जय महाराष्ट्र    

Webtitle : uddhav thackerays full speech while taking to mahavikas aaghadi MLAs 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com