6000 चौरस फुटांचा स्टेज, 70 हजार खुर्च्या; शपथविधीची शिवतीर्थावर जय्यत तयारी

संतोष थळे
Wednesday, 27 November 2019

  • उद्धव ठाकरेंचा ग्रँड शपथविधी सोहळा
  • सेनेकडून शिवतीर्थावर जय्यत तयारी
  • राजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण

ठाकरे सरकारच्या ग्रँड शपथविधी सोहळ्याचा स्टेज भव्य दिव्य असाच काहीसा असणार आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई शपथविधी सोहळ्यासाठी स्टेज तयार करतायेत. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला. त्याच ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी  सहा वाजून 40 मिनिटांनी इतिहास घडणार आहे. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

  • उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी सहा हजार चौरस फुटांचा भव्य व्यासपीठ उभारला जातोय. 
  • मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे.
  • शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 70 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.
  • शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले जाणार आहेत.

Image may contain: outdoor

या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण सर्वपक्षांचे प्रमुख नेते,सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री, कला, क्रीडा विश्वातील मान्यवरांना देण्यात आल्याचं कळतंय यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, यांना आमंत्रण दिल्याचं कळंतय. विशेष म्हणजे या सोहळ्याचं  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलंय राज्यातले 500 शेतकरीही या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

शपथविधी सोहळ्याला होणारी गर्दी आणि व्हीआयपींची उपस्थित पाहता कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिल्या युतीचा सरकारचा शपथविधी सोहळा ही  शिवाजी पार्कवर पार पडला होता आता पुन्हा एकदा तोच शिवाजी पार्क आणखी एका भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याचा साक्षिदार ठरणार आहे. 

Webtitle : uddhav thackerays oath taking ceremony and preparations on shivaji park


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackerays oath taking ceremony and preparations on shivaji park