शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या उल्हासनगरमध्ये सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

उल्हासनगर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या 17 मे रोजी उल्हासनगरमध्ये येत आहेत. त्यांच्या हस्ते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि जाहीर सभा होणार आहे. यावेळी युवकांचे प्रेरणास्थान-आकर्षण युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

उल्हासनगरच्या गोलमैदान येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय सज्ज झालेले आहे. डॉ.शिंदे यांचे एकमेव जनसंपर्क कार्यालय हे डोंबिवलीमध्ये आहे. त्यामुळे उल्हासनगर-अंबरनाथ मधील नागरिकांना किंबहूना मतदारांना येणेजाणे त्रासदायक ठरत होते. त्याअनुषंगाने लोकाग्रहास्तव उल्हासनगरात जनसंपर्क कार्यालय सज्ज करण्यात आले आहे. यापुढे डॉ.श्रीकांत शिंदे सातत्याने दोन्ही ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

17 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार असल्याने या उच्चभ्रू वसाहती सोबत संपूर्ण उल्हासनगरचे भगवेमय वातावरण निर्मित करण्यात आले आहे. सर्वत्र मोठमोठे कटाऊट, भगवे झेंडे झळकले आहेत. उद्या जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी उल्हासनगरचे वातावरण दणाणून जाणार असल्याचे गोपाळ लांडगे, राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

याप्रसंगी ठाणेजिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, गटनेते रमेश चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, महिला शहर संघटक मनीषा भानुशाली, ग्राहक संरक्षण शहरप्रमुख जयकुमार केणी, युवासेना उपजिल्हाधिकारी सोनू चानपूर, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,सुमित सोनकांबळे सह सर्व नगरसेवक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख महिला आघाडी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Uddhav Thackeray's in Ulhasnagar tomorrow