अखेर यू-डायस नोंदणीला सुरवात

Udise-Code
Udise-Code

मुंबई - यंदापासून यू-डायस (युनिफाइड डिस्ट्रिक्‍ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन) प्रणाली ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देण्यात आल्या होत्या. या प्रणालीत शाळांना 30 एप्रिलपर्यंत माहिती भरता येणार आहे.

देशातील सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसच्या माध्यमातून मिळवण्यात येते.

व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधांची माहिती, शाळांतील सोई-सुविधा, शिक्षकांची संख्या आणि पदे, रिक्त पदे आदी माहिती या माध्यमातून दरवर्षी एकत्रित केली जाते. राज्यात हे काम दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत चालते. यंदा मात्र हे काम ऑनलाइन होत असल्याने मुदतीत पूर्ण झाले नव्हते. या वर्षी यू-डायस प्लस या नावाने नवे डोमेन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात सर्व शाळांना लॉगइन आयडी देऊन सर्व डाटा ऑनलाइन एकत्रित केला जाणार आहे.

शाळा, तालुका आणि जिल्हा या स्तरांवरील माहिती अर्जांद्वारे मागवून ऑनलाइन नोंद केली जाणार आहे. याबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 2018-19 या शैक्षणिक वर्षापासूनची शाळांची ऑनलाइन नोंदणी जूनमध्ये होईल. यू-डायस प्लस या अत्याधुनिक प्रणालीतून कमीत कमी वेळेत देशभरातील शाळांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. देशातील सर्व शाळांची माहिती 30 जूनपूर्वी यू-डायस प्लस या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदवण्यात येईल.

त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांना 31 मार्चपर्यंत डाटा कॅप्चर फॉरमॅटचे (डीसीएफ) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत शाळेची माहिती भरायची असून, ही माहिती भरल्यानंतर 31 मेपर्यंत सुधारणा करण्याची संधी मिळेल.

डॅशबोर्ड, शाळांचे ऑनलाइन लोकेशन, थर्ड पार्टी व्हेरीफिकेशन या सुविधा यू-डायस प्लसमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com