उल्हासनगरात पाणी बिलावर अभय योजनेस प्रारंभ

दिनेश गोगी
शनिवार, 31 मार्च 2018

उल्हासनगर : तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंजूरी दिलेल्या उल्हासनगरकरांवरील पाण्याच्या थकीत बिलावर अभय योजनेला उद्या 1 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. एप्रिलच्या अखेरच्या तारखेपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के व्याज व विलंब शुल्काची माफी मिळणार आहे.

उल्हासनगर : तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंजूरी दिलेल्या उल्हासनगरकरांवरील पाण्याच्या थकीत बिलावर अभय योजनेला उद्या 1 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. एप्रिलच्या अखेरच्या तारखेपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के व्याज व विलंब शुल्काची माफी मिळणार आहे.

मे महिन्यातील पहिला पंधरवाडा 50 टक्के आणि अखेरच्या पंधरा दिवसात 25 टक्के माफी देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे थकीत मालमता कराच्या वसुलीसाठी अभय योजना राबवून व्याजाच्या रकमेत सूट देण्यात आली होती. त्यामुळे वसुलीला प्रतिसाद मिळाला, त्याच धर्तीवर पाण्याच्या थकीत बिलावर अभय योजना राबविण्यात यावी असा प्रस्ताव सूचक म्हणून स्थायी समिती सभापती कांचन लुंड व अनुमोदक म्हणून शिवसेना नगरसेवक सुनिल सुर्वे,साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यांनी मागच्या महासभेत सादर केला होता.

त्यास तेव्हाचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हिरवा कंदील दाखवला होता. निंबाळकर यांची पुण्याला बदली झाल्यावर त्यांच्या जागी आयुक्तांचा पदभार हाती घेणारे गणेश पाटील यांनी 1 एप्रिलपासून पाण्यावरील थकीत बिलासाठीची अभय योजना सुरू केली आहे.शेरी लुंड यांनी ही माहिती दिली.

घरगुतीवर 17 तर कमर्शियलवर 175 कोटींची थकबाकी
पाणी बिलाची चक्रावून सोडणारी अशी धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे. उल्हासनगरात नळांचे 45 हजार 28 घरगुती कनेक्शन असून त्यापैकी 26 हजार 163 नागरिकांवर 17 कोटी थकबाकी आहे. कमर्शियलचे 3 हजार 125 कनेक्शन असून त्यापैकी 1 हजार 731 व्यावसायिकांवर तब्बल 175 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे.

विशेष म्हणजे मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांना वेठीस धरण्याचा त्यांच्या संपत्या सील करण्यात आल्या आहेत. मात्र कमर्शियल मंडळींवर 175 कोटींच्या वर थकबाक्या असताना पाणी पुरवठा विभाग निद्रावस्थेत आहे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Ulhasnagar administration to roll out special scheme to recover water bills