अतिक्रमण विरोधी पथकाची मोबाईल बाजारात कारवाई

दिनेश गोगी
शनिवार, 8 डिसेंबर 2018

उल्हासनगर : जाहिरातीचे 40 लाख रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या बड्या मोबाईल कंपन्यांचे ग्लोसाइन बोर्ड उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केले आहेत.17 सेक्शन मधील मोबाईल बाजारात जेसीबी मशीनने ही कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा थकबाकी भरण्याचा चालढकलपणा चव्हाट्यावर आला आहे.  

उल्हासनगर : जाहिरातीचे 40 लाख रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या बड्या मोबाईल कंपन्यांचे ग्लोसाइन बोर्ड उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केले आहेत.17 सेक्शन मधील मोबाईल बाजारात जेसीबी मशीनने ही कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा थकबाकी भरण्याचा चालढकलपणा चव्हाट्यावर आला आहे.  

उल्हासनगर महापालिकेने 2015 मध्ये दुकानांवर ग्लो साइन बोर्डमार्फत केल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांवर कर लावून तो वसूल करण्यासाठी निविदा काढली होती. हि निविदा आसन बालानी यांच्या पवन  यांनी जाहिरात कंपनीने सुमारे 55 लाख रुपये किंमतीत भरली होती. मात्र मागील तीन वर्षात अवघ्या10 टक्के व्यापाऱ्यांनी या कर अदा केला. असे असतानाही पावन कंपनीने मागील तीन वर्षात पालिकेला सुमारे दिड करोड रुपये अदा केले. वारंवार बदलणाऱ्या आयुक्तांकडे याबाबत पवन जाहिरात कंपनीने तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दुकानदारांना नोटीस पाठवून तात्काळ पैसे भरण्यास सांगितले होते.
पण, त्यानंतरही व्यापाऱ्यांनी पैसे भरण्यास टाळमटाळ केली.

तीन महिन्यांपूर्वी पवन जाहिरात कंपनीने थेट आयुक्ताना नोटीस पाठवत पैसे वसुलीसाठी प्रशासनाने मदत न केल्यास पैसे भरणार नाही असा पवित्रा घेतला होता. हि बाब पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना माहित पडताच त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, भगवान कुमावत, दत्तात्रय जाधव याना पवन जाहिरात कंपनी बरोबर मिळून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या पथकाने 17 सेक्शन व छत्रपती शिवाजी महाराज येथील मोबाईल बाजारात धडक देऊन जेसीबी मशीन द्वारे ग्लोसाइन बोर्ड उध्वस्त करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे धास्तावलेल्या काही व्यापाऱ्यांनी चेक द्वारे पैसे अदा केले. संपूर्ण शहरातील मोबाईल व्यापाऱ्यांनी तात्काळ जाहिरातीची थकबाकी केली नाही तर त्यांच्या मालमत्ता कर पावतीत थकबाकीची रकम समाविष्ट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
 

Web Title: Ulhasnagar: Anti-encroachment team action in mobile market