Crime News: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत सख्ख्या भावानेच केली हत्या

Crime news
Crime newsesakal

उल्हासनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सख्या भावानेच 12 वर्षीच्या लहान बहिणीला मारहण करत हत्या केला आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या 12 वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Crime news
Shiv Sena Case : तो विषय वेळीच संपला असता तर ही वेळ आली नसती; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवारांची खंत

12 वर्षीय मृत मुलगी ही आपला मोठा भावासोबत उल्हासनगरमध्ये राहत होती. मुलीला काही दिवसांपूर्वीच मासिक पाळी आली होती. त्यामुळे तिचे कपडे रक्ताने माखले होते. कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून भावाने आपल्या लहान बहिणीला याबाबत विचारणा केली. पण मुलगी वयाने अगदीच लहान असलेल्या तिला आपल्या शरीरात झालेले बदल भावाला सांगता येत नव्हते.

मात्र भावाच्या बायकोने शंका व्यक्त करत सांगितले की तुमच्या बहिणीचं काहीतरी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि जो काही रक्तस्त्राव होतोय तो शारीरिक संबंध झाल्यामुळे होत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर भाऊ हा प्रचंड संतापला त्यानंतर त्याने आपल्या बहिणीला प्रचंड मारहाण सुरू केली.

'तुझे शारीरिक संबंध झाले आहेत का?' अशी सतत विचारणा तो तिला करत होता मात्र ती लहान असल्याने तिला घडलेला प्रकार सांगता येत नव्हता. तरी देखील तो तिला मारत राहिला आणि त्याच मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.

Crime news
Sanjay Raut: "प्रशासकीय अधिकारी, पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत"; राऊतांनी मांडली भूमिका

यानंतर भावाने तिला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या.

त्यामुळं डॉक्टरांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ७ मे रोजी घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com