esakal | उल्हासनगरात तृतीयपंथींनी 20 वर्षांपासून जपला 'श्रीं'च्या स्थापनेचा पायंडा
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

अनेक शहरात सण, उत्सव आणि लग्न समारंभात नृत्य करून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणाऱ्या या तृतीयपंथींनी लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प असतानाही जमा असलेल्या पुंजीतून बाप्पाच्या स्थापनेची परंपरा अबाधित ठेवली.

उल्हासनगरात तृतीयपंथींनी 20 वर्षांपासून जपला 'श्रीं'च्या स्थापनेचा पायंडा

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : कोणतेही उपासमारीने संकट ओढवल्यास नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेणाऱ्या उल्हासनगरातील तृतीयपंथींनी गेल्या 20 वर्षांपासून बाप्पाच्या स्थापनेच्या परंपरेचा पायंडा कायम ठेवला आहे. भाविक त्यांच्या घरी जाऊन बाप्पाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत आहेत.

मोठी बातमी : सुशांतच्या घराच्या तपासणीत त्याच्या हत्येच्या दाव्याबाबत पुरावा सापडला?

उल्हासनगर रेल्वेस्थानक पूर्वेला सीमारेषेच्या बाजूलाच एक वस्ती असून त्यात अनेक तृतीयपंथी राहतात. या ठिकाणी राहणाऱ्या सायरा शेख आणि विद्या देडे या तृतीयपंथींनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्या घरी बापाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून सायरा व विद्यासोबत काही तृतीयपंथी दर वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. शेजारचे नागरिक, व्यापारी आरती, पूजाअर्चेत सहभागी होतात. अनेक शहरात सण, उत्सव आणि लग्न समारंभात नृत्य करून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणाऱ्या या तृतीयपंथींनी लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प असतानाही जमा असलेल्या पुंजीतून बाप्पाच्या स्थापनेची परंपरा अबाधित ठेवली. सायरा शेख यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीला तयार जेवण वाटप करण्यासाठीदेखील पुढाकार घेतला होता. 

महाड इमारत दुर्घटनाः अमित शहांकडून दखल; दुर्घटनेवर अन्य नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया, जाणून घ्या

आम्ही दर वर्षी 5 दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतो. शेजारच्यांच्या उपस्थितीत वाजतगाजत विसर्जन करण्यासाठी जातो. यंदा सर्व बंदी घालण्यात आल्याने पालिकेच्या संकलन केंद्रात जाऊन मूर्ती सुपूर्द करणार आहोत. या कोरोनाच्या विळख्यातून देशाची सुटका करा, पुन्हा सर्वांना रोजगार मिळवून द्या, पूर्ववत जीवन सर्वांच्या नशिबी येऊ द्या, अशा विनंतीचे साकडे बाप्पाकडे करत आहोत. 5 व्या दिवशीदेखील बाप्पाला निरोप देताना पुन्हा साकडे घालणार, अशी माहिती सायरा शेख, विद्यासागर देडे यांनी दिली. 

(संपादन : वैभव गाटे)

In Ulhasnagar establishment of Shree ganesh from last 20 years

loading image
go to top