उल्हासनगर पालिकेत अधिकाऱ्यांचा शुकशुकाट

दिनेश गोगी 
बुधवार, 3 मे 2017

निवडणुकीत सरकारच्या आदेशाचे पालन करण्याला प्राधान्य आहे. हा आदेश डावलून चालत नाही. पनवेल पालिका निवडणुकीची तसेच उल्हासनगरची जबाबदारी अधिकारी प्रवास करून पार पाडतात. हे कसब असून आम्ही ते निभावणार आहोत.
- जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त

उल्हासनगर - पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने पालिकेत शुकशुकाट आहे. अधिकारी नसल्याने काम ठप्प असून महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पनवेल निवडणुकीसाठी, तर पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची उल्हासनगरला नुकतीच अदलाबदली करण्यात आली आहे. २४ मे रोजी पनवेलची निवडणूक असून २६ तारखेला मतमोजणी आहे. उल्हासनगर पालिकेत आधीच मनुष्यबळ कमी आहे. फिरून फिरून त्याच त्या अधिकाऱ्यांकडे आलटून पालटून विविध विभागांचा पदभार सोपवण्यात येत असताना पनवेल निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या सरसकट ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पनवेलच्या निवडणुकीचे काम हाताळून उल्हासनगर पालिकेचेही कामकाज हाताळावे, असा आदेश उपायुक्त मुख्यालय जमीर लेंगरेकर, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, सहायक आयुक्त मंगला माळवे, लेखापाल विभागातील अशोक जाधव, विनायक फासे, उपकर निर्धारक व संकलक शैलेश दोंदे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र चोईथानी, दीपक ढोले, हनुमंत खरात, परमेश्‍वर बुडगे, विनोद खामितकर, तरुण सेवकानी, संदीप जाधव, प्रोग्रामर श्रद्धा सपकाळे-बाविस्कर, संगणक अभियंता संतोष लोणे, भांडार विभागप्रमुख विनोद केणे, वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे, लिपिक बाळू भांगरे, दीप्ती लादे, कर विभागातील अनिल आहुजा, जेठा ताराचंद, मनोज साधवानी यांना देण्यात आलेला आहे.

अधिकाऱ्यांना डबल ड्युट्या कराव्या लागत आहेत. मुख्य लेखा परीक्षक सुखदेव बलमे, सहायक आयुक्त मनीष हिवरे, लेखापाल विभागातील मनोज जाधव, रूपा संखे, संस्कृत बिडवी, आदेश उबाळे यांना पनवेल निवडणुकीसाठी वर्ग करण्यात आलेले आहे.

बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी
उल्हानगरमधील मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग पनवेल निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याने आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य लेखाधिकारी दादा पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजया जाधव, शहर अभियंता राम जैसवार, पाणीपुरवठा अभियंता कलई सेलवन, सहायक आयुक्त प्रबोधन मवाळे, बालाजी लोंढे, गणेश शिंपी, अजित गोवारी, अलका पवार, दत्तात्रय जाधव आदी बोटावर मोजण्याइतपत अधिकारीच २४ दिवस उल्हासनगर पालिकेचे कामकाज हाताळणार आहेत.

Web Title: Ulhasnagar municipal corporation