उल्हासनगर पालिकेसाठी कॉंग्रेसचे 78 उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

उल्हासनगर - फेब्रुवारीत होणाऱ्या 2017 च्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत कॉंग्रेस 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. पालिकेत पक्षाची सत्ता येऊन महापौरही कॉंग्रेसचाच असेल, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, "1999 मध्ये कॉंग्रेस सत्तेत असताना उल्हासनगरच्या विकासाची खरी सुरवात झाली. त्यानंतर शिवसेना, भाजपने शहराला मागे नेले. आता कॉंग्रेसने कंबर कसली असून विकासाच्या वचनासोबतच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 78 प्रभागांसाठी इच्छुकांनी संख्या मोठी असून त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. 

नोटाबंदीविरोधात पक्षातर्फे 6 आणि 8 जानेवारीला राज्यस्तरीय आंदोलने होणार आहेत. 50 दिवस उलटूनही बॅंकेबाहेर रांगा तशाच आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि नागरिकांच्या नशिबी मात्र दारिद्य्र अशी परिस्थिती आहे, अशी टीका कानडे यांनी केली. या वेळी प्रदेश सचिव नीलेशकुमार, जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, गटनेत्या जया साधवानी, नगरसेविका अंजली साळवे, पदाधिकारी गोपी हसीजा, माजी महापौर मालती करोतिया, वाल्मीक नेते राधाचरण करोतिया, स्वाभिमानचे जिल्हासंघटक रोहित साळवे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष किशोर धडके आदी उपस्थित होते. 

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation for the 78 Congress candidates