उल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

उल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री राजकुमारी नानिकराम वधारिया यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. 

स्व.राजकुमारी यांच्या मागे राजेश, मुकेश व उमेश अशी तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.आज सायंकाळी 5 ते 5.30 दरम्यान स्व.राजकुमारी वधारिया यांच्या पगडी रस्मचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये आमदार ज्योती कलानी, महापौर मीना आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, ओमी कलानी, उद्योगपती महेश अग्रवाल, नंद जेठाणी, सुमित चक्रवर्ती, पितू राजवानी यांच्या सोबत सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार उपस्थित होते.

Web Title: Ulhasnagar Municipal Councilor Rajesh Wadharia's mother passed away