उल्हासनगर पालिका जनसंपर्क अधिकारीपदाचा पदभार विनोद केणे यांच्याकडे

दिनेश गोगी
गुरुवार, 12 जुलै 2018

उल्हासनगर - केबिनमध्ये सापडलेल्या 387 दस्तावेजांचा समाधानकारक खुलासा न करणारे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशानव्ये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी भदाणे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांची नियुक्ती केली आहे. 

आज केणे यांनी जनसंपर्क अधिकारीचा पदभार स्विकारला आहे. एकीकडे उल्हासनगरातील स्वच्छता राखण्याची तर दुसरीकडे जनसंपर्क अधिकारीची अशी दुहेरी जबाबदारी विनोद केणे हाताळणार आहे.

मे महिन्यात भदाणे हे रजेवर गेले असताना त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी घरी ठेवली होती. त्यामुळे त्यात काही वादग्रस्त दस्तावेजांचे घबाड असल्याच्या तक्रारी नगरसेवक राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव, मनोज लासी यांनी केल्यावर केबिन सील करण्यात आली होती. केबिन उघडल्यावर त्यात कोरे चेक, महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे उप आयुक्त, अनेक फाईली, शिक्के असे 387 दस्तावेज मिळाले होते. 

आयुक्त गणेश पाटील यांनी या मिळालेल्या दस्तावेजांचा खुलासा युवराज भदाणे यांना मागितला होता. त्यांनी तो दिल्यावर चौकशी अधिकारी मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर हे प्रकृती कारणास्तव रजेवर गेले होते. ते परत आल्यावर त्यांनी दिलेल्या अहवाला नुसार खुलासा समाधानकारक नसल्याने पाटील यांनी भदाणे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. भदाणे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी चार दिवस व विद्यमान पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनीही चार दिवसांचे आमरण उपोषण केले होते.आमदार ज्योती कालानी यांनी देखील सुरू असलेल्या उपोषणा बद्दल नागपूर अधिवेशनाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशान्वये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी प्रभारी जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.मुख्य स्वच्छता निरीक्षक हे पद सांभाळून जनसंपर्क अधिकारी हे पद देखील ही हाताळण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.या दोन्ही पदाची जबाबदारी इमानेइतबारे गालबोट न लागू देता पार पाडणार अशी प्रतिक्रिया विनोद केणे यांनी व्यक्त केली.मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार,कामगार नेते चरणसिंग टाक,दीपक दाभने,दिलीप थोरात,सामान्य प्रशासन अधिकारी अच्युत सासे,पालिका पतपेढीचे व्यवस्थापक बाळासाहेब सांगळे आदींनी केणे यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Ulhasnagar Municipality has appointed Vinod Keane as the Public Relation Officer