उल्हासनगरात 'सैराट' फेम घटना; प्रेमविवाहातून हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

उल्हासनगर: लहान भाऊ मोठे झाल्यावर त्यांनी त्यांच्या बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाचा वचपा काढण्यासाठी बहिणीच्या नवऱ्यावर तलवार-चाकू हल्ला केल्याची सैराट फेम घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत.

वीर तानाजी नगरातील गुरुद्वाराच्या मागे राहणारा व मजूर काम करणारा 28 वर्षीय रविंद्र लाडगे याने सात आठ वर्षापूर्वी अंबरनाथ मधील मुस्लिम तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी या तरुणीचे भाऊ इरफान खान, सोनू खान लहान होते. या भावांनी विशी पार केल्यावर त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने रविंद याला तानाजी नगरातील मशिदी जवळ गाठले आणि आणि त्याच्यावर तलवार-चाकूने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या रविंद्रला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इरफान खान, सोनू खान या दोन भावांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दोघा अनोळखींना लवकरच जेरबंद करण्यात येणार आहे. हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी ही माहिती दिली.

Web Title: ulhasnagar news love marriage attack brother arrested