उल्हासनगर पालिकेचे सोळा सफाई कर्मचारी निलंबित

दिनेश गोगी
गुरुवार, 22 जून 2017

उल्हासनगर - बदली झालेल्या ठिकाणी हजर न राहण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिकेतील 16 सफाई कर्मचाऱ्यांना यांना महाग पडला आहे. हजर राहण्याच्या आदेशाचे, नोटिसींचे उल्लंघन केल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशान्वये उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी हजर न राहणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ही पहिलीच घटना असल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

15 मार्च रोजी उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची निवडणुकीसाठी पनवेलला, तर पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची उल्हासनगर अशी अदला बदली करण्यात आली होती. कोणताही धोरणात्मक निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट करणाऱ्या डॉ. शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून किंबहुना नोकरीला लागल्यापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून काम करणाऱ्या 170 शिक्षकांच्या आणि 1250 सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. प्रथम शिक्षकांनी हजर होण्यासाठी विरोध केला. मात्र डॉ. शिंदे यांनी कारवाईचा इशारा देताच शिक्षकांवर हजर होण्याची वेळ आली. बहुतांश सफाई कर्मचारी हजर देखील झाले.पण अनेकांनी नोटीसा बजावूनही हजर होणे टाळले. अशातच डॉ. शिंदे यांची पुन्हा पनवेलला बदली झाली.

निंबाळकर यांनी उल्हासनगरचा पदभार स्विकारला. मात्र डॉ. शिंदे यांनी केलेल्या बदल्यांचे काही सफाई कर्मचा-यांनी उल्लंघन केल्याचा अहवाल प्राप्त होताच,निंबाळकरांच्या आदेशान्वये 16 सफाई कर्मचा-यांना निलंबित केल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली.अजून दुसरा अहवाल आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांच्या कडून प्राप्त होणार आहे.आजाराचे निमित्त पुढे करुन जे कर्मचारी कामावरच येत नाहित अशा कर्मचा-यांना थेट सेवेतुनच बडतर्फ करण्याची शक्‍यता लेंगरेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: ulhasnagar news marathi news dismissed corporation news

टॅग्स