स्वाईन फ्ल्यूच्या साथीतून उल्हासनगर सुरक्षित

दिनेश गोगी
गुरुवार, 6 जुलै 2017

उल्हासनगर: एकीकडे ठाणे आणि शेजारील कल्याणच्या परिसरात स्वाईन फ्लूने आतंक निर्माण करताना अनेकांचे बळी घेतले असतानाच, उल्हासनगर मात्र स्वाईनफ्ल्यूच्या साथीतून सुरक्षित आहे. दोन संशयित रुग्ण ठणठणीत झाले असून, प्रयोगशाळेचे अहवाल चांगले आले आहेत, याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर अधिकाऱ्यांची पाठ थोपटणार आहेत.

अवघ्या 13 किलोमीटर क्षेत्रफळात उल्हासनगर शहर वसले असून, पाच लाखाच्या वरील लोकसंख्या दाटीकुटीने राहत आहेत. अशात व्हायरल फिव्हर, जुलाब अशी साथ या शहरात वातावरणा नुसार राहते. मात्र, एकीकडे स्वाईन फ्ल्यूने उपनगरातील ठाणे, कल्याण येथे हैदोस घातला असताना उल्हासनगरात मात्र दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने ते ठणठणीत झाले असून घरी गेले आहेत. अधीक्षक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी यास दुजोरा दिला आहे.

उल्हासनगरात 80 खाजगी नोंदणीकृत दवाखाने असून, चार परवानाधारक लॅब आहेत. खाजगी रुग्णालयात एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण नसून, प्रयोगशाळेचे अहवालामध्ये काहीही आढळून आलेले नाही, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.

साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरी आरोग्य केंद्र सक्रिय असतात, स्वच्छता विभाग जागरूक असून, आरोग्य कर्मचारी सातत्याने तैनात राहतात. इतर शहरांच्या तुलनेत उल्हासनगर स्वाईन फ्ल्यूच्या साथी पासून सुरक्षित असून, अधिकारी कौतुकास पात्र असल्याची पोचपावती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

Web Title: ulhasnagar news swine flue and ulhasnagar safe