कर बुडविणाऱ्यांची कार, टीव्ही जप्त करणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

उल्हासनगर - अभय योजनेंतर्गत सवलत दिल्यावरही तब्बल  ८० टक्के करबुडव्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याने अशा कर बुडविणाऱ्यांची स्थावर तसेच कार, टीव्ही, मोबाईल अशी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा फतवा शुक्रवारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी काढला आहे. त्यामुळे भविष्यात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेकडून सक्ती केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उल्हासनगर महापालिका परिसरात एकूण १ लाख ७२ हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी ८० टक्के मालमत्ताधारकांची २९४ कोटींची थकबाकी आहे; तर हा मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत संपायला काही दिवसांचा अवधी शिल्लक असून या मुदतीत जर मालमत्ता कर भरला नाही, तर थकबाकीदारांच्या स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे टीव्ही, मोबाईल, कार जप्त करून त्यांचा महापालिका नियमानुसार लिलाव करण्यात येणार आहे. तसेच अशा मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांद्वारे जाहीर करण्याचा इशाराही आयुक्त निंबाळकर यांनी या फतव्याद्वारे दिला आहे.

बड्या असामींची पाठ
करवसुली अधिकांश प्रमाणात व्हावी आणि नागरी विकासकामांना गती मिळावी, या सकारात्मक उद्देशाने निंबाळकर यांनी पाचव्यांदा अभय योजना लागू केली होती; मात्र या योजनेंतर्गत केवळ १९ कोटी रुपयांची करवसुली झाली असल्याने बड्या असामींनी मात्र या योजनेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चपर्यंत नियमित कर न भरणाऱ्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार आहे.

Web Title: ulhasnagar news tax ulhasnagar mahapalika