उल्हासनगर पालिकेचे दोन सहायक आयुक्त निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

उल्हासनगर  - कल्याण-अंबरनाथ रोडजवळ असलेल्या बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा केल्याचा ठपका ठेवून सोमवारी (ता. 16) उल्हासनगर पालिकेच्या दोन सहायक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनीष हिवरे व दत्तात्रय जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केलेल्या या कारवाईमुळे पालिका अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

सहायक आयुक्त मनीष हिवरे आणि दत्तात्रय जाधव यांच्या कार्यकाळात कल्याण-अंबरनाथ रोडजवळ काही व्यापाऱ्यांकडून बेकायदा बांधकामे करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. 13) ही बांधकामे पाडण्यासाठी आयुक्त निंबाळकर हे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यासोबत गेले होते. तेव्हा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, युवा सेना अधिकारी बाळा श्रीखंडे या शिवसैनिकांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने निंबाळकर, भदाणे यांच्याशी वाद घातला. हिवरे, जाधव यांनी तेव्हाच या बांधकामांवर अंकुश ठेवला असता, तर हा प्रसंग ओढवला नसता. त्यानंतर या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिवरे यांच्या जागी प्रबोधन मवाळे आणि जाधव यांच्या जागी पालिकेचे वरिष्ठ लिपिक नीतेश रंगारी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Ulhasnagar news ulhasnagar municipal corporation