उल्हासनगरात सट्टेबाजांवरील कारवाईचा रात्रीचा खेळ चाले ; 3 जण अटकेत

12 लाखाच्या रोकडसह 13 लाख 81 हजाराचा ऐवज जप्त
ulhasnagar
ulhasnagarsakal

उल्हासनगर : ठाण्याच्या सेंट्रल क्राईम ब्रँच युनिटने उल्हासनगरात छापा टाकून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून हवाला आणि गुगल पे द्वारे क्रिकेट बेटिंगचा सट्टा खेळणाऱ्या उल्हासनगरातील 3 सट्टेबाजांवर अटकेची कारवाई केली आहे.त्यांच्याकडून तब्बल 12 लाख रुपयांच्या रोकडसह एकूण 13 लाख 81 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कॅम्प नंबर 3 मधील 17 सेक्शनमध्ये असणाऱ्या थारियासिंग दरबार जवळील महाबजाज व्हिला या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर दुबई शारजा येथे सुरू असलेल्याआयपीएल क्रिकेट टुर्णामेंट मधील मुंबई इंडियन आणि दिल्ली कॅपिटल या मॅचवर क्रिकेट बेटिंग घेण्यात येत आहे.अशी माहिती ठाणे सेंट्रल क्राईम ब्रँच युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होणराव यांना मिळताच त्यांनी टीमसोबत सायंकाळी उल्हासनगर गाठले.

सायंकाळी 5 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या तपासात सट्टेबाज धर्मेंद्र बजाज,राहूल बजाज,चिरंजीव आहुजा हे तिघेजण इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने हवाला व गुगल पे द्वारे क्रिकेट बेटिंग घेऊन आणि लॅपटॉपवर खेल खेल या नावाच्या लेजर सॉफ्टवेअर मध्ये नोंदी करत होते.या सर्व पुराव्यांची खात्री पटल्यावर धर्मेंद्र बजाज,राहुल बजाज,चिरंजीव आहुजा यांना अटक करण्यात आली.आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 तारखेपर्यंत पोलीस कष्ठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होणराव करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com