उल्हासनगरातील व्यापाऱ्यांवर गुंडांच्या दहशतीचे सावट

दिनेश गोगी
शुक्रवार, 4 मे 2018

उल्हासनगर : अलीकडच्या काही दिवसांपासून गुंडांकरवी व्यापाऱ्यांवर हमल्याच्या लुटमारीच्या घटना घडत असून त्यामुळे व्यापारी दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत.याबाबत व्यापारी महामंडळाने पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगर : अलीकडच्या काही दिवसांपासून गुंडांकरवी व्यापाऱ्यांवर हमल्याच्या लुटमारीच्या घटना घडत असून त्यामुळे व्यापारी दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत.याबाबत व्यापारी महामंडळाने पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी, बन्सी हेमदेव, सच्चानंद गोपलानी, गुरूजीतसिंग, मेघराज लुंड आदिंनी हे निवेदन पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना दिले आहे. दीपक वाटवानी या व्यापाऱ्यावर हमला करून त्यांच्या कडील 13 लाख रुपये आरोपींनी हिसकावून नेले आहेत.महानगरपालिका समोर मेन रोडवर असलेल्या अमर फास्ट फूड या दुकानाचे मालक व मुलावर हमला करण्यात आला आहे.व्यापाऱ्याच्या दुकानांचे शटर तोडून चोऱ्या केल्या जात असल्याचे लक्ष निवेदनाद्वारे वेधण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी यांनी दिली.उपायुक्तांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर एक उद्योजक शहर असून होलसेल कपड्यांच्या बाजारपेठा, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक बाजार हे प्रमुख आकर्षण आहे. लग्नसोहळा असो की दिवाळी यावेळी बाजारपेठांचा परिसर हाऊसफुल्ल असतो.सिंधी व्यापारी हा कोणत्याही भानगडीत पडत नसून दुकानात आलेल्या नागरिकांचे समाधान करने हे कर्तव्य समजतो.अशा व्यापाऱ्यांना किरकोळ कारणावरून लक्ष केले जात असल्याची खंत देखील रुपचंदानी यांनी व्यक्त केली.

दरम्यान उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, परमानंद गेरेजा आदींनी देखील ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांवर होत असलेल्या हल्ले, चोऱ्या, बाईकस्वारांच्या अतिरेका बाबत निवेदन दिले आहे.
 

Web Title: ulhasnagar s businessman have fear of gunds